
पुणे : महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ठरवून देण्यात आलेल्या मुदतीत काम पुर्ण करीत नसलेल्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा मिळाला नाहीतर, संबंधितांवर वेळप्रसंगी कारवाई करावी, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना सोमवारी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले.

कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देत, जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिली.ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते नुतनीकरण, पावसाळ्यापुर्वीची नालेसफाई आणि मलनिस्सारण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांचा सोमवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहाणी दौरा केला. पोखरण रस्ता क्रमांक दोन वरील कानवुड चौकातून पाहाणी दौऱ्याला सुरूवात केली. या चौकाच्या परिसरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामाची पाहाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
