वडगाव सराफ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष डॉ माळी यांची बिनविरोध

पेठवडगाव : येथील वडगाव सराफ व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ मोहनलाल रामलाल माळी यांची तर उपाध्यक्ष पदी सुभाष अनंतराव म्हेत्तर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एम जी शिंदी होते.

यावेळी किराणा भुसारीचे व्यापारी विजय दिगंबर झगडे, सतीश आण्णासो चौगुले या नव्या चेहऱ्याना संधी दिली तर सौ जयश्री सुनील कुडाळकर व मयूर सुनील म्हेत्तर यांच्यावर संचालक पदाची खांदे पालट करण्यात आली आहे.याशिवाय सुरेंद्र चंपालाल माळी,पिराजी मानाजी माळी,सौ मीराबाई बाबूलाल माळी, सौ सुनीता सुधीर पोळ, यांची फेर निवड करण्यात आली. आभार व्यवस्थापक बाळासो पाटील यांनी मानले.

🤙 8080365706