
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संभाजीराजे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत संभाजी राजे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमुर्तीला शुध्द सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाची बैठक कोल्हापुरात संपन्न झाली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील अनेक शिवभक्त उपस्थित होते.
