
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी नियमावली तयार केली आहे. मंदिर परिसरात यासंदर्भात फलक लावण्यात आला आहे. संस्थानच्या या निर्णयाचे अनेक जणांकडून स्वागत करण्यात आले आहे.
नियमावलीचे पालन न करणाऱ्या लोकांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर आडवण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यांची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरु झाली.तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले आहेत. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. भाविकांना मंदिर प्रवेशदारावर अडवण्यात आले आहे. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे मंदीर संस्थांनने आवाहन केले आहे.
