….तोपर्यंत औरंगाबाद हेच नाव लिहावे : आस्तिककुमार पाण्डेय

संभाजीनगर :काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरु केली होती. परंतु औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली आहे.

याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असा आदेश काढला आहे.उच्च न्यायालयाच्या 20 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या आदेशाचे व आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,असेही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी निर्देश दिले आहेत.

🤙 8080365706