घरफाळा देयकाच्या चालु मागणीवर 6 टक्के सवलत योजनेचा 10571 करदात्यांनी घेतला लाभ

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या करआकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2023/24 या आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाच्या चालु मागणीवर 1 एप्रिल 2023 ते 31 जुन 2023 अखेर 6 टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलत योजनेअंतर्गत 10571 इतक्या करदात्यांनी लाभ घेतला आहे.

शहरातील सर्व मिळकतधारकांना पोस्ट ऑफीसमार्फत सन 2023/24 या आर्थिक वर्षासाठीची सुमारे 1,57,547 इतक्या मिळकतीची देयके छपाई करुन वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून शहरातील मिळकत कर चालू मागणी एक रक्कमी भरणा करणाऱ्या 10,571 मिळकत धारकांनी दि.1 एप्रिल ते 16 मे 2023 अखेर 4 कोटी 13 लाख 85 हजार सातशे बावन्न रुपये इतका कर भरणा केला आहे. यामधील सुमारे 4456 करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतला आहे. शहरातील नागरीकांना घरफाळा बिले पोस्टाने घरी पोहचण्यास विलंब झाल्यास मिळकतधारकांनी आपल्याकडील जुनी कराचे बिल, भरणा पावती किंवा मिळकत करदाता क्रमांक सांगून कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात अथवा महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने आपला चालु वर्षातील संपुर्ण घरफाळा भरुन 6 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

🤙 8080365706