
कोल्हापूर : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील वाणिज्य विभागातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या एकूण १०४ विद्यार्थ्यांची फ़िन्ड्राइव्ह सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि क्यू – गेट फायनान्सियल टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वित्त कंपन्यांमध्ये निवड झाली.

या दोन वित्त कंपन्यांकडून एकूण ११८ विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाची चाचणी व तोंडी मुलाखत घेण्यात आली. त्यातून १०४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये शिरीष सुभाष टेमगिरे lead Mobilization अधिकारी ग्लोबल टॅलेंट ट्रॅक, पुणे यांचेकडून दोन आठवड्यांचे BFSI व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, व डॉ. श्रुती जोशी यांच्या हस्ते निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. निवड झालेले हे सर्व विद्यार्थी अल्पावधीतच वेगवेगळ्या पदावर रुजू होतील.या सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. संजय लठ्ठे, प्रा. सतीश चव्हाण, डॉ. रेवती पाटील, वीजडम फौंडेशनचे डॉ. अजय मस्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
