
आंब्याच्या फोडीचा अस्सल केशरी नैसर्गिक रंग पाहून ते खाण्याची इच्छा होते. आंब्याची फोड कापल्यानंतर लगेच काळी पडू नये यासाठी काही सोपे उपाय.

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मध मिसळून घ्यावे. मध संपूर्णपणे पाण्यांत विरघळेपर्यंत पाणी ढवळून घ्यावे. आता आंब्याच्या कापलेल्या फोडी या मिश्रणात बुडवून ठेवाव्यात. जर आपल्याला मध आवडत नसेल तर आपण मधा ऐवजी साखरेचा देखील वापर करु शकतो. मधामध्ये असणारे पेप्टाइड कंपाऊंड पॉलीफेनॉल ऑक्सिडेस एन्झाइमला फिनोलिक संयुगे गडद रंगद्रव्यांमध्ये रूपांतरित करण्यापासून प्रतिबंधित करते, यामुळे आंब्याच्या फोडींचा रंग बदलून काळा होत नाही.
आंबे धुवून कापून घ्या आणि झिपलॉक बॅगेमध्ये भरून घ्या. ही पिशवी डिप फ्रिजरमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या गोठवलेल्या आंब्याचा आनंद आपण घेऊ शकता. गोठवल्याने फळ खराब होण्याची क्षमता कमी होते. फळ डिप फ्रिज करून ठेवल्याने फळांमधील सूक्ष्म जीवांची वाढ रोखण्याचे काम केले जाते.
आंब्याच्या तुकड्यांना लिंबू पाण्यात भिजवा. याशिवाय आंब्याच्या फोडी कापून त्याच भांड्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते आणि आंबा काळा होत नाही.
