नाटय कलाकाराने आपला मूळ आवाज ओळखला पाहीजे : प्रा. उमेश घळसासी

कोल्हापूर : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दि. 12, व 13 मे 2023 रोजी ‘शब्द आणि अभिनय’ या विषयावर मुंबईचे प्रसिध्द नाटय व चि़त्रपट प्रशिक्षक प्रा. उमेश घळसासी यांची दोन दिवसीय कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेसाठी संगीत व नाटयशास्त्रेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये अभिनय प्रकार, व्हाईस कल्चर, भूमिका अभ्यास तसेच एकाग्रता, आवाजासाठी वापरली जाणारी सप्तके इत्यादी नाटय कलेसाठी आवश्यक विषय हाताळले गेले. यासाठी प्रा. घळसासी यांनी विद्यार्थ्यांकडून विविध संस्कृत श्लोक, खेळ, आवाजा संदर्भातील व्यायाम करून घेतले. ‘नाटय कलाकाराने आपला मूळ आवाज ओळखला पाहीजे व सातत्याने आवाजाचा रियाज केला पाहीजे’ असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आवर्जून सांगितले.

या प्रात्याक्षिकसह मिळालेल्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना झाला. या कार्यशाळेची सुरवात सरस्वती पूजनाने झाली. विभागातील प्राध्यापक डॉ. निखिल भगत यांनी प्रा. उमेश घळसासी यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद ठाकूर देसाई यांनी केले तर पाहुण्यांची ओळख अतुल परीट यांनी करून दिली. डॉ. संजय तोडकर यांनी कार्यशाळेच्या समापनाच्यावेळी सर्वांचे आभार मानले. ध्वनीव्यवस्था व रंगमंच व्यवस्था मल्हार जोशी यांनी केली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांबरोबर अधिविभागामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706