गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल….

सोलापूर : आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे. गौतमीच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच बार्शी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. गौतमी पाटील हिने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं.

🤙 8080365706