आता मंत्रिपदच घेऊन येतो : भरत गोगावले

कोल्हापूर : पक्षप्रतोद पद गेले, आता मंत्रिपदच घेऊन येतो असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये केले आहे.

पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना कुठल मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामुळे गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण दिसून येत आहे.सत्तासंघर्षावर गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा होणार का ? यात कोणाकोणाची वर्णी लागणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय होऊ द्या मग मंत्रिमंडळ विस्ताराचे पाहू असे सांगत इच्छूकांना थोपवून धरल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.• शिंदे गटाला केंद्रातही मिळणार मंत्रिपद महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात सुद्धा शिंदे गटाला 2 मंत्रीपदे मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करतील. किमान दहा दिवसात विस्ताराबाबत निर्णय होईल. एकूण 20 जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

🤙 8080365706