आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष: वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील.

वृषभ:  नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. कुटुंबापासून दूर जाल. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये.

मिथुन: मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दूर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते.

कर्क: भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. स्त्रीयांसोबत सन्मानाने आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो.

सिंह: ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या: स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडून येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्यादृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल.

तूळ : आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृश्चिक: प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील.

धनु: नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल.

मकर: भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरिवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल.

कुंभ: मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील.

मीन: आर्थिक सहकार्य लागेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. 

🤙 8080365706