रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या…

पुणे : सध्या उन्हाळी सुट्यांच्या हंगाम सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जात आहेत.

याअंतर्गत आता पुणे-इंदूर ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.पुणे-इंदूर ही साप्ताहिक गाडी असून, तिच्या १४ फेऱ्या होणार आहेत. पुणे स्थानकावरून ही गाडी १९ मे ते ३० जून या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदूरला पोहोचेल. इंदोरमधून ही गाडी १८ मे ते २९ जून या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी इंदूरमधून दर गुरूवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३ वाजून १० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

🤙 8080365706