
कोल्हापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी क्षुल्लक कारणावरून तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई ‘मॅट’ने रद्द केली आहे. या आदेशामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दणका बसला आहे.

तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर एका कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईविरुद्ध जिल्हा परिषद विभागातील कर्मचाऱयांनी आंदोलनही केले होते. दरम्यान, डॉ. जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची गडचिरोली जिल्हा परिषद येथे बदली करण्यात आली. या निलंबन कारवाईविरुद्ध जाधव यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली असता, त्यांची निलंबनाची कारवाई रद्द झाली आहे. शासनाने धुळे येथे सहायक संचालक (कुष्ठरोग) अधिकारी म्हणून पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅट’च्या निर्णयाने आरोग्यमंत्री सावंत यांना दणका बसला आहे.
