बालचमुचे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

कोल्हापूर: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी पेठेतील मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

मिरवणुकीत सहभागी 300 हुन अधिक शिबिरार्थीनी लाठी काठी, लेझीम, दांडपट्टा यांची प्रात्यक्षिके सादर केली. सकाळी ९ वाजता पापाची तिकटी येथे संभाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उप शहर अभियंता नारायण भोसले, संभाजी महाराज स्मारक अभियंता प्रमोद बराले, बांधकाम व्यावसायिक रणजित निकम, माजी नगरसेवक ईश्वर परमार, वस्ताद पंडित पोवार, डॉ. रविंद्र कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक या मार्गावरून मिरवणूक पार पडली.

🤙 8080365706