
अकोला : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या राड्याचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी आहे.

तसेच या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टवरुन या वाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
