
कोल्हापूर: महानगरपालिकेतर्फे पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज बेट विकसित करण्यात येत असून सदरचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सदर कामामध्ये अंतर्भूत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्युरल चे काम सुरू असून ते काम मूर्तिकार शिल्पकार किशोर पुरेकर करत आहेत. सदर म्युरलची प्राथमिक पाहणी आज दिनांक 13 मे 2023 रोजी शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांनी केली. त्यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, आर्किटेक्ट रणजीत निकम, शिव शंभू प्रेमी पंडित अण्णा पोवार, आश्किन आजरेकर, श्रीराम जाधव, अभिजीत सूर्यवंशी, उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांचे म्युरल परीक्षणाकरिता स्मारक समिती गठीत करण्यात येणार असून त्यामध्ये इतिहास अभ्यासकांचा,तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असून समितीने दिलेल्या सूचनेनुसार म्युरल चे काम अंतिम करण्यात येणार आहे.
