युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट दिल्लीत

मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जावून वकील देवदत्त कामत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टात अतिशय बेधडकपणे ठाकरे गटाची भूमिका मांडली होती. वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्यासह देवदत्त कामत यांनीदेखील कोर्टात महत्त्वाचा युक्तिवाद केला होता.

आता सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात ठाकरे गटाने आर्धी लढाई जिंकली आहे. अजूनही पूर्ण लढाई लढायची राहिली आहे. त्याच कायदेशीर लढाईसाठी स्वत: आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. याआधी ठाकरे गटाचे नेते अनिल परब, अनिल देसाई हे दिल्लीत वकिलांच्या भेटीगाठी घेण्यासाठी येत होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे दिल्लीत आले आहेत.

🤙 8080365706