“संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी ; राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेच्या अधिक बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार, भाडोत्री माणसावर काय बोलणार अशी टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाहीये. संजय राऊतांकडे दुर्लक्ष करा. पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल माहिती नाही. संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल, असं टीकास्त्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांवर डागलं आहे.

🤙 8080365706