‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता, दुसऱ्या आठवड्यात सिनेमा तब्बल २५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारु शकतो.

अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण भारतात सध्या फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा बोलबाला दिसत आहे. तर जगभरात ३७ देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी सिनेमा टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड रिपोर्टनुसार, पहिल्या आठवड्यात सिनेमाने ८१.३६ कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या आठवड्याची सुरुवात १२ कोटी रुपयांनी झाली आहे. अशा प्रकारे सिनेमाने आतापर्यंत तब्बल ९३.३६ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा १०० कोटी रुपयांपर्यंच मजल मारेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🤙 8080365706