परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे.

शिंदे सरकारने परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका केली आहे. याआधीच उपायुक्तपदाचं निलंबन मागे घेतलं होतं. त्यानंतर आरोपातून सुटका केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना मदत केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्ताला निलंबित केले होते. पण, आता शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेश मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी कर्तव्यावर वागण्याचा आदेश दिला आहे. याआधी निलंबित पोलीस उपायुक्ताचे निलंबन रद्द केले आहे.

🤙 8080365706