आजपासून आम्ही नवीन व्हिपची नियुक्ती प्रक्रिया सुरू

मुंबई : व्हिप म्हणून कुणाला नियुक्त करायचं हे राजकीय पक्ष ठरवेल, त्या प्रमाणे आजपासून आम्ही नवीन व्हिपची नियुक्ती प्रक्रिया सुरू करू असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.

भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती ही चुकीची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून नवा प्रतोद नियुक्त करणयासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नवा प्रतोद निवडण्याची प्रक्रिया ही आजपासूनच सुरू करण्यात येईल असं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. व्हिप म्हणून नियुक्ती करताना ज्या काही चुका राहिल्या त्या सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिल्या असं ते म्हणाले.

🤙 8080365706