जयंत पाटील यांना ईडीची नोटीस ; सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत.

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात.यामुळे राष्ट्रवादी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस यावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. आयएल आणि एफएस या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.यामध्ये अनेक नावे समोर आली होती. याआधी या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झाले आणि पोलिसांकडून यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यात आता जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

🤙 8080365706