विमा महागणार….

नवी दिल्ली : माेटार वाहनांसह विविध प्रकारचा विमा महागणारविमा महागणार आहे. प्रीमियममध्ये सुमारे १० ते १५ टक्के वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमा रिन्युअलचे दर वाढले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात मालमत्ता, कर्ज, मोटार वाहन इत्यादी विम्यासाठी प्रीमियमचा दर किमान १० टक्क्यांनी वाढू शकतो. भारतातील कंपन्या अनपेक्षित देणी, मोठे नुकसान इत्यादींमुळे हाेणारा ताेटा कमी करण्यासाठी मोठ्या रकमेचा विमा घेतात. आग, समुद्री जाेखीम, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक व्यत्यय कव्हर करण्याचा त्यांचा हेतू असतोे. मात्र, आता या कंपन्यांचाही विम्यापाेटी खर्च वाढणार आहे.जागतिक कंपन्यांनी विमा रिन्युअलच्या प्रीमिअममध्ये ४० ते ६० टक्के वाढ केली आहे. त्याचा भारतातही परिणाम होण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706