
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष: मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही.
वृषभ: नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी सरळमार्गी मिळणाऱ्या पैशाला महत्व द्यावे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल.
मिथुनः आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढती व बदली होण्याचे योग आहेत. व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या हवास्यापोटी होऊ घातलेला खर्च वाचवा. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. व्यापारात वाढ होईल.
कर्क: व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली मनासारखी होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील.
सिंह: आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये, याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे.
कन्या: आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलांची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील.
तूळ आपसातील वाढ समजदारीने मिटवा. नवीन घर प्रापर्टी खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. भावडांशी वादविवाद टाळा. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
वृश्चिकः प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल.
धनु: नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे.
मकर: गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल.
कुंभ: अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल.
मीन: गुप्तता महत्वाची कागदपत्रे घरातील रोकड यांची याबाबत दुर्लक्ष होता कामा नये. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरा संबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे.
