राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन दिवस जे घडले तो तर घरगुती तमाशा : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ती सर्व स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निष्ण साधला आहे.

कसबा मतदार संघामध्ये बूथ प्रमुखांचा महामेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाला.त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली.राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार दुसऱ्याला कसे पक्षाचे अध्यक्ष होऊ देतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ते सर्व स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता.

🤙 8080365706