
बँगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात उतरले आहेत. मराठी मते मिळवण्यासाठी भाजपने शिंदे यांना मैदानात उतरवले आहे.

त्यामुळे शिंदेचा भाजपला कितीपत फायदा होणार हे पहावे लागेल. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषिक असलेल्या सीमावर्ती भागाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.यामागचं कारणही समोर आलं आहे. कर्नाटकात भाजपने सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने चांगलीच रणनीती आखली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आता बँगलोरमध्ये जाऊन प्रचार करत आहेत.
