
कोल्हापूर- यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या स्त्री-पुरुष हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देण्याचे सत्र सुरू आहे.सोमवारी 8 मे रोजी सकाळी 9 वाजल्या पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुस्लिम बोर्डिंग येथे हज यात्रेदरम्यान हज यात्रेतील विधींसोबतच सौदी अरेबिया मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशलेस रियाल व्यवहाराबाबत सुद्धा बँकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

ज्यांचे नाव हज कमिटी ऑफ इंडियाच्या हज यात्रेतील यादीत यापूर्वी आले आहे असे एकूण 340 व प्रतीक्षा यादीतील कव्हर नंबर 4000 पर्यंतच्या यात्रेकरूंनी आपल्या अर्ज दाखल करताना जमा केलेल्या कागदपत्रांच्या प्रतींसह सोमवारी 8 तारखेला होणाऱ्या या महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन हज फौंडेशन आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे.
