
मुंबई : ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे नाना पटोले यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. मात्र याबाबत महाविकास आघाडीत कुठलीही चर्चा झाली नाहीये. महाविकास आघाडीच्या बाबतीत जी चर्चा केली जातेय ती संपली आहे. लवकरच आम्ही महाविकास आघाडीचे सर्व सहकारी एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं. त्यावर शरद पवार बोलते झाले. “आता सांगता येत नाही.पण जबाबदारी घेण्याची पण तयारी पाहिजे. सुप्रिया सुळेंचे सध्या बारामतीवर लक्ष आहे. निवडणूक संपल्यावर शांतपणे निर्णय घेऊ”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
