नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधी स्थळ येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता दिनाच्या निमित्ताने नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधी स्थळ येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.

यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने छत्रपती शाहू मिल येथे ०६ मे ते १४ मे दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या निमित्ताने कोल्हापूर मधे नगरवासियांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या दिव्य दृष्टीतून कोल्हापूर जिल्हा आज सुजलाम सुफलाम आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला प्रयत्नांची पराकाष्ठा करत पैलू पाडण्यात महापुरुष यशस्वी होतात म्हणूनच त्यांचं आयुष्य एखाद्या हिऱ्यासारखं अनमोल होतं. राजर्षी शाहू छत्रपती हे सुध्दा असेच आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक सद्गुणांचा संचय केलेले महापुरुष. कोल्हापूर राज्याला आणि बहुजन समाजाला सर्वच क्षेत्रात अग्रभागी आणण्यासाठी झटलेल्या या राजानं एवढं प्रचंड कार्य करुन ठेवलंय की, आजही समाजातील सर्वच घटकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करायला हवी. विशेषतः आजच्या युवापिढीनं शाहू महाराजांच्या काही सद्गुणांचा स्विकार करायलाच हवा.आज नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधी स्थळ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला माझ्या समवेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ,छत्रपती संभाजीराजे, कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर साहेब, शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मा. श्री. धनंजय महाडिक आणि मा. श्री. धैर्यशील माने, आमचे नेते आमदार पी एन पाटील (सडोलीकर), मा. श्री सतेज पाटील, मा. श्री. प्रकाश आवाडे, मा. श्री. राजेश पाटील, मा. श्री. ऋतुराज पाटील मा. श्री. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सौ. कादंबरी बलकवडे ( महानगरपालिका आयुक्त ) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

🤙 8080365706