लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर प्रेस क्लब च्या वतीने अभिवादन..

कोल्हापूर : सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज सर्वत्र छ.शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.

येथील पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनेहीलोकराजाला अभिवादन करण्यात आले.स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ऋतज्ञता पर्वाची सांगता करताना,सकाळी दहा वाजता संपूर्ण कोल्हापूरकरांनी शंभर सेकंद ज्या-त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून,छ.शाहूंच्या प्रती मानवंदना देऊन,आपली ऋतज्ञता व्यक्त केली.जिल्ह्यात आज सर्वत्र विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांच्या वार्तांकनासाठी तसेच छायाचित्रणासाठी पत्रकार आणि फोटोग्राफर व कॅमेरामन व्यस्त असतात.शेजारी कर्नाटक राज्यातील निवडणूक तसेच रत्नागिरी येथील बारसू आंदोलनाच्या वार्तांकनासाठीही येथील पत्रकार बांधव गेले आहेत. या सर्वांच्या वतीने आज कोल्हापूर प्रेस क्लब येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, सचिव बाबासाहेब खाडे,संचालक पांडुरंग दळवी आदींनी छत्रपती शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.तसेच शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.

🤙 8080365706