आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष:  सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल.

वृषभ: अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदारांकडून सहकार्य लाभेल.

मिथुन: धर्मसत्ता राजसत्तेतिल लोकांपासून फायदा होईल. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. रोजगारात आपल्या स्वभावाचा इतर गैरफायदा तर घेत नाहीत ना याकडे लक्ष दया. नवीन व्यापारात प्रगती होण्याचे संकेत मिळतील. व्यापारात नवीन संबंध प्रस्थापित होईल.

कर्क:  मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापाराकरिता आजचा दिवस नुकसान हानीची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल.

सिंह: शत्रूवर मात कराल.स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक स्थिति सुधारेल.कर्ज प्रकरणं मंजुर होतील. कोणताही टोकाचा विचार किंवा अतिरेकी वृत्ती टाळा. व्यसनापासुन दुर राहा.

कन्या: चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर पत्नी व इतर सदस्यांकडून असहकार्य मिळाल्यामुळे मन नाराज होऊ शकते.

तुळ: बोलण्यावर संयम ठेवावा. हितशत्रुचा काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. धंदा व्यवसायात मोठ्या व्यवहारात पुरेशी काळजी घेणे हिताचे ठरेल. भागीदारीत अपेक्षित लाभ होयाचे योग आहेत. लेखन कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील.

वृश्चिक: घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आपली कार्यकुशलता व इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे.

धनु: कामातली प्रगती पाहून समाधान व्यक्त कराल. संततीच्या दृष्टीने येणाऱ्या शुभवार्ता अभिमानास्पद ठरतील. व्यापारात दिनमान उत्तम आहे. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. आप्तेष्ट नातेवाईकांशी असलेले संबंध मर्यादित ठेवा.

मकर :  मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे वागणे टाळावे. अंहकारीवृत्तीला आळा घाला. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

कुंभ: व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. आर्थिक योजनावर चर्चा व्यापार-व्यवसाय चांगला चालेल. इतरांना न जमणारी कामे तुम्ही यशस्वीरित्या हाताळाल. त्यामुळे वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहिल.

मीन: सहनशीलता कमी होऊ देऊ नका. व्यापारात नवीन योजनावर कार्य सुरु होईल. नातेवाईकांबदल विचारात बदल होईल. मनाचा दाखविलेला मोठेपणा नातेसंबंधातील तेढ कमी करणारा ठरेल.

🤙 8080365706