मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच,मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे : देवेंद्र फडणवीस

चंदगड : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे.

आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो. बेळगाव येथील दौऱ्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता निट्टूर गावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली.फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत.चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून फडणवीस चंदगड तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसंच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच चंदगडला पुन्हा एकदा येणार असल्याचे सांगितले.

🤙 8080365706