खुपिरेत सोमवारी कुस्त्यांचे मैदान

कुडीत्रे : खुपिरे (ता. करवीर) तलाव तालीम व्यायाम मंडळ (लास्ट ग्रुप) यांच्या वतीने सोमवार दि. ८ मे रोजी बेमुदत निकाली कुस्त्यांचे मल्लयुद्ध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध रविकुमार, दिल्ली हिंदकेसरी यांच्यात होणार आहे.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बाबासो राणगे , आरे (मोतीबाग तालीम) विरुद्ध सनिकेत राऊत, पडळ ( कै. युवराज पाटील कुस्ती संकुल, कुंभी-कासारी साखर कारखाना) यांच्यात होणार आहे. तृतीय क्रमांकासाठी अतुल डावरे (मोतीबाग) व सतीश खरात (गंगावेश) यांच्यात लढत होईल. चौथ्या क्रमांकासाठी निलेश पोवार (वाकरे) व प्रवीण पाटील (चाफोडी)यांच्यात लढत होईल. पाचव्या क्रमांकासाठी भगतसिंह खोत (राष्ट्रीय विजेता कुंभी कासारी सं.) व भाऊसो कोडवडे (महाराष्ट्र चॅम्पियन द्रोणागिरी आखाडा, राशिवडे) यांच्यात लढत होईल. सहाव्या क्रमांकासाठी शुभम उर्फ लखन पाटील (खुपिरे) व सुनिल पाटील (म्हाळुंगे) यांच्यात लढत होईल. सातव्या क्रमांकासाठी रोहित पाटील (साबळेवाडी) व ऋत्विक लाड (आळवे) यांच्यात लढत होईल. आठव्या क्रमांकासाठी साहिल पाटील (खुपिरे) व दिग्विजय पाटील (माजनाळ) यांच्यात लढत होईल. यावेळी प्रेक्षणीय महिला कुस्त्या होणार आहेत. सृष्टी साबळे (खुपिरे) राजनंदिनी पाटील(शिरोली दुमाला) यांच्यात लढत होईल. तसेच चटकदार ८० पेक्षा जास्त कुस्त्या होणार आहेत. यावेळी दिनानाथ सिंह, विश्वास हारुगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

🤙 8080365706