
मुंबई : शरद पवारसाहेब हे खंबीर नेते आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा पक्षाला कमजोर करणारा असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

जस ठाकरे तिकडे शिवसेना. तसं शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी मी फार बोलणं योग्य होणार नाही. पण सद्या ईडी आणि सीबीआयचा वापर करून पक्ष फोडले जात असल्याचे राऊत म्हणाले. याबाबत शरद पवार यांनी सीबीआय आणि गृहमंत्री अमित शाह याना एक पत्रही लिहलं आहे. यामध्ये त्यांनी राजकीय नेत्यांवर, विरोधी पक्षांवर कसा दबाव आणला जात आहे ते संगितल्याचे राऊत म्हणाले.
