
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.

बारसू रिफायनरीवरुन सध्या राजकारण चांगलंच तापलंय. बारसूवासियांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते.उद्धव ठाकरे उद्या शनिवारी आंदोलकांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रिफायनरी समर्थक देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संमती पत्रे सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत.
