
बेळगाव : भाजप उमेदावराच्या प्रचारासाठी बेळगावात आलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने सगळ्या राजकीय पक्षांना आधीच केले होते, पण तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव उत्तरचे भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी आल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. फडणवीस यांच्या धिक्काराच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिसांनी तातडीने धाव घेत समिती कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणाकडे जाण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
