
बालिंगा :फुलेवाडी रिंग रोड परिसरामध्ये उपनगरामधे चोरीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

रिंग रोड परिसरामध्ये अमृत पार्क शिंदे कॉलनी जिल्हा परिषद कॉलनी येथे दररोज किमान दोन ते तीन बंद दरवाजे फोडून चोरट्यांचे चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदर भाग येत आहे .रात्रीची गस्त घालणारे पोलिसांची संख्या अपुरी,तसेच करवीर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने तपास यंत्रणेवर तणाव येत आहे.

तसेच श्वान पथकाच्याही मर्यादा अपुरी पडत आहे आणिरिंग रोड परिसरातील कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा हलगर्जीपणा कारणीभूत आहे.
सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे लोक परगांवी व बाहेर फिरायला जात असताना शेजारीपाजारी अथवा पोलीस स्टेशनला कुठलीही कल्पना न देता आपल्या घरामध्ये पैसे अडका मौल्यवान दागिने ठेवून कुलूप घालून जातात,अशावेळी चोरी करणाऱ्या चोरांचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की रात्री बंद घर दिसले चोरी होणार की काय अशी भीती आता नागरिकांना वाटत आहे. करवीर पोलिसांनी नागरिकांना सतर्क व सावधान राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
