आदिपुरुष’ चित्रपटाच्या ट्रेलरबाबत मोठी माहिती समोर

मुंबई : प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ हा असाच एक चित्रपट आहे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. त्यांचा हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. आत्तापर्यंत ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित प्रभास, क्रिती सेनॉन आणि सनी सिंगचे अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये तिघेही राम, सीता आणि लक्षच्या लूकमध्ये दिसत होते.

आदिपुरुषचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. पिंकविला या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर ९ मे रोजी रिलीज होऊ शकतो. वेबसाइटनुसार, चित्रपटाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की ९ मे रोजी संध्याकाळी मुंबईत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि प्रदर्शित केला जाईल. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर जवळपास ३ मिनिटांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

🤙 8080365706