गांधींनगर रोडवरील मोठमोठ्या जाहिरात फलकांचे ऑडिट करण्याची मागणी

कोल्हापूर : गांधीनगर रोड वरती उचगांव गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडे, गांधीनगर हद्दीतील असणारे मोठेमोठे होल्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिटसह फलकांची नोंद संबंधीत ग्रामपंचायत मध्ये ठेवणे बाबत. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापार पेठे सह अन्य जिवनावश्यक सर्वच वस्तुंची होल्सेल व रिटेल बाजार पेठ असून, तावडे हॉटेल पासुन रस्त्याच्या दोन्ही बाजुस मोकळ्या जागेत तर काही ठिकाणी दुकानांच्या इमारतीवर मोठ मोठे जाहिरातीचे फलक मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. ह्या रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात गर्दी असते दुकानातही कामगारांच्या मोठ्या संख्येसह ग्राहकांची मोठी गर्दी असते आता पावसाळ्यांमध्ये वादळी वारे मोठ्या प्रमाणात सुरू होते त्यावेळी कोणताही अपघात होऊ नये संबंधीत मोठ मोठ्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासह त्यांची नोंद ग्रामपंचायतमध्ये असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नही मिळू शकते व सदर जाहिरात फलकाचा दर्जाही तपासणीमध्ये समजू शकतो. आपल्याकडून तसे आदेश व्हावेत. वादळी वाऱ्यामध्ये जर का कोणता अपघात झाला तर संबंधीत दुकान मालकासह सदर हद्दतील ग्रामपंचायतीवर अपघाताचा गुन्हा नोंद होण्याबाबत करवीर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार मा. बिपीन लोकरे यांना देण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार विजय जाधव उपस्थित होते.

यावेळी लोकरे यांनी लवकरात लवकर फलकांचे ऑडिट करून बेकायदेशीर फलकांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायतींना कळवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उ.जि. समन्वयक विक्रम चौगुले, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, उपतालुकप्रमुख राहुल गिरूले, हिंदुत्ववादी शरद माळी, विभागप्रमुख विरेंद्र भोपळे, योगेश लोहार, अजित चव्हाण, फेरीवाला उ.ता. प्रमुख बाळासाहेब नलवडे, सचिन माळी, युवासेना समन्वयक सचिन नागटीळक, मनोज कुरळे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706