
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गौण खनिज वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनांस जीपीएस डिव्हाईस बसवून वाहतुक करण्यास 1 मे 2023 पासून बंधनकारक करण्यात आल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी दिली आहे

.
वाहनांसाठी बसविण्यात येणारे जीपीएस डिव्हाईस हे Automotive Research Association of India द्वारे प्रमाणित Standard 140 यांचेच असावे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या. https://mahakhanij.maharashtra.gov.in/GPS Manufacturer List.aspx वाहनमालकाने जीपीएस डिव्हाईस वाहनात बसविल्यानंतर शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा.लि. यांचे (020-67800800) या दुरध्वनीवर संपर्क साधून जीपीएस डिव्हाईस महाखनिज प्रणालीसोबत तात्काळ आपल्यास्तरावर लिंक करून घ्यावे.गौण खनिज वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनांस जीपीएस डिव्हाईस बसवून वाहतुक करण्यास दि. 01 मे 2023 पासून प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नंतर गौणखनिज वाहतुक करणाऱ्या कोणत्याही वाहनास महाखनिज प्रणालीमधून E-TP (निर्गत वाहतूक पास) Generate केले जाणार नाहीत व अशा वाहनाने गौण खनिज वाहतूक केल्याचे आढळून आल्यास ते अवैध समजले जाईल. महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून निरीक्षणाच्या वेळेस जीपीएस डिव्हाईस शिवाय बिना E-TP गोण खनिजाची वाहतूक करणारी वाहने आढळली तर ती अवैध समजून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7), (8) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व गौणखनिज खाणपटटा धारक व खाण परवानाधारक यांनी गौणखनिज वाहतुक करणा-या वाहनास शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार जीपीएस डिव्हाईस बसवून गौणखनिज वाहतुक करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
