क्रिडाई कडून बा़धकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असून, बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्या बरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य शिबिर घेण्यात आले.

क्रिडाई कोल्हापूर संस्थेने आपल्या सभासदांच्या साईटवर काम करणाऱ्या कामगारांची BOCW खाली नोंदणी करणे त्यांचबरोबर या नोंदणी चे काय फायदे आहेत ते सर्व उपस्थित कामगारांना समजावून सांगितले.नोंदणी करणे कसे फायद्याचे आहे ते यावेळी सांगण्यात आले. या शिबिरात मध्ये २०० कामगारांची नोंदणी करण्यात आली.त्याच बरोबर सी.पी.आर हॅास्पिटल, लोटस मेडिकल फाउंडेशन, ओम हॉस्पिटल यांचे मार्फत कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यांमध्ये जनरल तपासणी, रक्त, लघवी तपासणी व डोळे तपासणी ही उपस्थित कामगारांची करण्यात आली. यावेळी चष्मे देखील देण्यात आले .तसेच नोंदणी करणाऱ्या कामगारांना क्रिडाई संघटने तर्फे प्रत्येक कामगारांना भेट वस्तु देण्यात आली.तसेच या कार्यक्रमास दिशा फॏडेशनचे सहकार्य लाभले. या संपूर्ण कामगारांच्या जेवणाची व्यवस्था महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाच्यावतीने करण्यात आली. राधाकृष्ण मंदिर, शाहुपुरी येथे घेणेत आलेल्या कार्यक्रमास सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, सचिव संदीप मिरजकर, खजानीस अजय डोईजड, मॅनेजिंग कमिटी सदस्य विजय माणगांवकर, सभासद चेतन चव्हाण, उदय निचिते, योगेश आठल्ये , महेश ढवळे , भारतीय कर्मचारी महासंघ चे अध्यक्ष दिलीप दादा जगताप, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे निरिक्षक राजेंद्र निकम,बॅक ऑफ महाराष्ट्रचे जन संपर्क अधिकारी मनमोहन राजा पाटील, सी.पी.आर च्या दिपा शिपुरकर- D.P.O , लोटस मेडिकल फाउंडेशन चे अमित गायकवाड, ओम् हॅास्पिटल चे योगी डांगे हजर होते. शेवटी सचिव संदीप मिरजकर यांनी सर्वांचे आभार मानले.

🤙 8080365706