
मोबाईलसाठी वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची आकर्षक दिसणारी मोबाईल फोन कव्हर घेत असतात. परंतु काही वापरानंतर हे मोबाईल फोन कव्हर खराब होतात. हे खराब झालेले मोबाईल कव्हर आपण लगेच फेकून देऊ शकत नाही. काहीवेळा आपण ते मोबाईल कव्हर तसेच कळकट, मळकट स्थितीत वापरतो. परंतु या खराब झालेल्या कव्हरची थोडी काळजी घेतल्यास आपण ते नव्यासारखे स्वच्छ करु शकतो

सर्वप्रथम, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की कोणत्या कारणामुळे फोन कव्हर घाण होते. वास्तविक, फोनच्या उष्णतेमुळे फोनच्या कव्हरचा रंग पिवळा होतो, जो साफ केल्यानंतरही काहीवेळा पिवळाच दिसतो. अशा परिस्थितीत तुम्ही फोनचे कव्हर बदलणे गरजेचे असते.
टूथब्रशने फोनचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी प्रथम मोबाईल कव्हर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात भिजवावे. यानंतर, टूथब्रशने फोन कव्हरची घाण साफ करावी. जर फोन कव्हर जास्त खराब झाले असेल तर डिटर्जंट सोल्युशन बनवा आणि त्यात फोन कव्हर भिजवा आणि नंतर जेव्हा तुम्ही सोल्युशनमधून फोन कव्हर धुवून बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला फोन कव्हर अगदी स्वच्छ झालेले दिसेल.
तुम्ही बेकिंग सोडा वापरून तुमच्या फोनचे कव्हर स्वच्छ करू शकता. कव्हर साफ करण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घ्यावा, नंतर ब्रशच्या मदतीने फोन कव्हरवरील पिवळे डाग घासून घ्या. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल कव्हर सहज स्वच्छ करू शकाल.
