
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 एप्रिल रोजी केरळमध्ये देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत.
वॉटर मेट्रो इलेक्ट्रिक हायब्रीड बोटीद्वारे 10 बेटांना कोचीशी जोडेल.याशिवाय केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसेच डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणीही ते करणार आहेत.वॉटर मेट्रो बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायब्रीड बोटीद्वारे कोचीच्या आसपासच्या 10 बेटांना शहरांशी जोडली जाणार आहे. कोचीसारख्या शहरात ही वॉटर मेट्रो खूप महत्वाची ठरणार आहे.
