
साळवण : एकनाथ शिंदे
कत्तलीसाठी बैलांना वाहून नेणारा टेम्पो गगनबावडा पोलिसांनी पकडला. या टेम्पो मध्ये 4 बैल निर्दयीपणे कोंबत ही जनावरे वाहून नेणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली असून,या प्रकरणातील सल्लाउद्दीन रमजान लांजेकर वय 35 रा.कोळपे ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गो हत्या आणि जनावरांच्या निर्दयी वाहतुकीस बंदी असताना जिल्ह्यात जनावरांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. अशातच पुन्हा एकदा गगनबावडा तालुक्यातील चौकात एस.टी स्टॅण्ड जवळ गगनगिरीकडे जाणाऱ्या कमानी जवळ नाकाबंदी करीत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जनावरे वाहून नेणारा टेम्पो आढळून आला.
गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला ताब्यात घेतलं असून, टेम्पोची पाहणी केली असता टेम्पो मध्ये 4 बैल आढळून आले. पोलिसांनी सर्व बैलांची सुटका केली असून त्यांना गोरक्षणात पाठवण्यात आले. या प्रकरणी ताब्यात असलेल्या सल्लाउद्दीन रमजान लांजेकर याची पोलिस कसून चौकशी करीत आहे.कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी करण्यात आलेली असताना मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी अनेकदा उघडकीस आल्या आहेत. पण बऱ्याच वेळेला पोलिसांवर दबाव टाकून अशी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केला जातो. गगनबावडा पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
