
मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला.
राज्यातील सरकारला धोका नाही. पण मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. त्यांच्या मताशी सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. पडद्यामागे सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
