
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असून, मुख्यमंत्री होण्याची चर्चा पाहायला मिळत आहे.दरम्यान यावरच प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मोठा दावा केला आहे. “अजित पवार म्हणत आहे की, आता जर मुख्यमंत्री झालो तर बरं होईल. पण आता तसं शक्य नाही. कारण जे आमचं ठरलं आहे ते ठरलं..त्याच्यात आता बदल नाही,” असं गोगावले म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या चर्चा आहे. अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आपल्याला मुख्यमंत्री होण्यास आवडेल आणि त्यासाठी 2024 गरज नाही असे वक्तव्य खुद्द अजित पवार यांनी केले आहे. मात्र यावरुन अनेक प्रतिक्रिया येत असताना अजित पवार यांना आता मुख्यमंत्री होणं शक्य नसल्याचं भरत गोगावले यांनी म्हटले आहे. विशेष आमचं ठरलं असून, त्यात काही बदल होणार नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, अजित पवार राष्ट्रवादीचा गट घेऊन सत्तेत आल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते.
