पावसाचा द्राक्षाला मोठा फटका

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका बसला असून, शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहे. सध्या द्राक्षबागा तोडणीला आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून बाजारात द्राक्षे पाठवली जात आहेत. मात्र, बाजारात उठाव नसल्याने माल शिल्लक राहात आहे. परिणामी, भावात मोठी घट झाली आहे.दरवर्षी १५ डिसेंबरपासून द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. यंदा पाऊस उशिरापर्यंत होता. त्यामुळे द्राक्ष बागांची छाटणी उशीरा झाली. परिणामी, फळेही उशीरा लागल्याने द्राक्षाचा हंगाम महिनाभराने पुढे सरकला आहे. दरवर्षी एप्रिलपर्यंत चालणारा हंगाम यंदा मे अखेरपर्यंत सुरू राहील. पावसाळी वातावरण कायम राहिल्यास द्राक्षांच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

🤙 8080365706