
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने प्रदिर्घ सुनावणीनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे.त्यामुळे हा निकाल कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी या संदर्भात भाष्य केले आहे.
वकील शिंदे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, न्यायालयाचा निकाल कधी येईल, हे सांगणे कठीण असले तरी सुद्धा 15 मेच्या आधी हा निकाल येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला होता. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.सरासरी एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिनाचा अवधी लागतो. जास्तीत जास्त किती कालावधी लागेल याची काही शाश्वती देता येत नाही. मात्र, महाराष्ट्राच्या खटल्यामध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने निकाल त्या आधी म्हणजे 15 मे पर्यंत लागेल.
