
नवी मुंबई; आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कारण्यात आला. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा पार पडला. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सदस्य त्यासाठी परिश्रम घेतले. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित होते.
